१५ ऑगस्ट म्हणजे काय? आपल्या झोपडपट्टीच्या गल्लीसमोर भर रस्त्यात स्पीकरची बॅरिकेड उभी करून त्यावर आज देशभक्तीची तर काही दिवसांनी गणपतीची तर कधी शिवाजी महाराजांची गाणी मोठ्याने लावून आपण मित्रांबारोबर चकाट्या पीटण्याचे स्वातंत्र्य मांडववाले, बॅनरवाले आणि ब्लडबँकवाले यांना गोळा करून दुसऱ्याच्या रक्तावर पुण्य कमावण्याचे सामाजिक कार्यकर्त्याचे स्वातंत्र्य चालत्या बस मधून थुंकण्याचे, रस्त्याच्या उजव्या बाजूने जाऊन रस्ता [...]